अलिबाग : कोरोनाने केवळ राज्यातच नव्हे तर जगभरात आपले हातपाय पसरले आहेत. पोलीस,प्रशासकीय अधिकारी,राज्य सरकार,केंद्र सरकारकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही काही महाभाग बेफिफिरपणे बाहेर फिरताना दिसत आहेत.
काही नागरिक रस्त्यावर फिरून सर्वांची डोकेदुखी वाढवत असताना आता अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देखील या भीषण परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे चित्र आहे. रायगडच्या महाड तालुक्यात कोरोनामुळे भीतीचे वातावरण असताना महाड पंचायत समिती कार्यालयात धक्कादायक बाब उघड झाली आहे.
झी चोवीस तास या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,मंगळवारी दुपारी येथील अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी चक्क पार्टी आयोजित केल्याची संतापजनक घटना घडली आहे. महाड पंचायत समिती कार्यालयातील बाळासाहेब ठाकरे सभागृह आणि सभापतींच्या दालनात ही पार्टी आयोजित केल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, महाड पंचायत समिती कार्यालयात केलेली मटणाची पार्टी अधिकाऱ्यांना चांगलीच भोवली आहे .एका अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित केल्याचं आता समोर येत आहे. जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या , संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट असताना बैठकीच्या नावावर सरकारी कार्यालयात मटणाच्या पार्ट्या आयोजित केल्याबद्दल नाराजी व्यक्त होत होती रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे . आणि त्याबाबतचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे . सी इ ओ हळदे यांच्या कारवाईने समाधान व्यक्त होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

