नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसचं मृत्यूतांडव काही थांबायचं नाव घेत नाही. मागील 24 तासांमध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये 638 लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व देशांमध्ये इटलीमध्ये मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक आहे. इटलीमध्ये मागील 24 तासांमध्ये 349 लोकांचा मृत्यू झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर योग गुरू बाबा रामदेव यांनी कोरोना’शी डॉन हात करण्यासाठी काही रामबाण उपाय सुचविले आहे. याबाबत ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘लोकांनी योग्य काळजी घेतली तर यापासून बचाव केला जाऊ शकतो,’ असं ते म्हणाले.
ते म्हणाले, ‘गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करा. सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर इतर लोकांपासून चार ते पाच फूट अंतरावर राहा. मास्कचा वापर करा,’ असं आवाहन रामदेव बाबांनी जनतेला केलं आहे. तसेच कोरोना व्हायरसला कदापीही घाबरण्याची गरज नाही, काळजी घेण्याची आवश्यकता आहे,’ असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा करा. याचा अस्थमा हृदय रोग आणि मधुमेहासाठीही चांगला फायदा होईल. मी लोकांना विनंती करतो,’ असे रामदेव बाबांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

