Share

रावसाहेब दानवे यांच्या कडून जिल्हयातील नागरिकांसाठी 60 हजार मास्क व 1600 लिटर सॅनिटायझरची उपलब्ध्ता

Published On: 

लातूर : संपूर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आपल्या देशात व राज्यात ही कोरोनाचा प्रार्दुभाव मोठया प्रमाणावर झालेला आहे. जिल्ह्यात हरियाणा येथून आलेल्या आंध्र्र प्रदेशातील यात्रेकरूंना कोरोना पॉझिटिव्ह झालेला होता. परंतु सध्या यात्रेकरू उपचार करून निगेटिव्ह झालेले आहे. तरी लातूर जिल्हयातील नागरिकांचा कोरोना पासून संरक्षण व्हावे म्हणून देशाचे ग्राहक संरक्षण व अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी 60 हजार मास्क व 1600 लिटर सॅनिटायझर पाठविलेले आहे.

हे सर्व मास्क व जिल्ह्याच्या सामुहिक दसरा महोत्सव समिती व छात्र फौंडेशन च्या सदस्यांना देण्यात येणार असून या सदस्यांमार्फत व जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने हे साठ हजार मास्क व सोळाशे लीटर सॅनिटीजरिंग बॉटल चे वाटप लातूर तालुक्यातील नागरिकांना तसेच जिल्ह्यातील नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे.

दसरा समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील वांजरखेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभैया ठाकूर, राजकुमार कलमे, व्यंकटेश हलिंगे,काले महाराज, शिरालकर, सुरज कानडे या सदस्यांच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री दानवे पाटील यांच्याकडून दिलेले कोरोना विषाणू संरक्षण साहित्य नागरिकांना वाटप करण्यात येणार आहे,अशी माहिती मंत्री महोदयांच्या कार्यालयांकडून देण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाची परवानगी घेऊन दिलेले साहित्य वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात येत आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!