टीम महाराष्ट्र देशा : IPL 2020च्या मोसमासाठी कोलकातामध्ये लिलाव प्रक्रिया सुरू आहे. या लिलावासाठी एकूण ९७१ क्रिकेटपटूंनी नोंदणी केली होती. त्यातून अखेर ३३२ खेळाडूंची नावे लिलाव प्रक्रियेसाठी अंतिम करण्यात आली आहेत. त्यानंतर गुरूवारी सकाळी आणखी ६ खेळाडूंना या यादीत समाविष्ट करण्यात आले. या खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान आठ संघांना आपला चमू पूर्ण करण्यासाठी एकूण ७३ खेळाडू हवे आहेत. त्यापैकी २९ खेळाडू हे परदेशी असणार आहेत.
आतापर्यंत झालेल्या लिलावात ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स महागड्या खेळाडूंपैकी एक ठरला आहे. त्याला १५ कोटी ५० लाखांना कोलकाताने आपल्या संघात घेतला आहे. तर ग्लेन मॅक्सवेलसाठी दिल्ली आणि पंजाबमध्ये चढाओढ सुरु होती, अखेरीस १० कोटी ७५ लाखांच्या बंपर बोलीवर मॅक्सवेल पंजाबकडून खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर १० कोटींची बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणार आहे. तर अॅरोन फिंचही ४ कोटी ४० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुह्या ताफ्यात सहभागी झाला आहे. भारताचा रॉबिन उथप्पा ३ कोटींच्या बोलीवर राजस्थानच्या ताफ्यात दाखल झाला आहे. तर चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी , युसूफ पठाण, स्टुअर्ट बिन्नी यांना आठही संघांनी नापसंती दर्शवली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1207615743845531648?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1207614480084897793?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

