Share

जन्माच्या आधीच त्यांनी केला बाळाचा सौदा

Published On: 

औरंगाबाद : जन्माच्या आधीच मुल विक्री करणाऱ्यासह विकणाऱ्यासह एक महिलेला क्रांतिचौक पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे बाळ अजून जन्मालाच आलेलं नाही अशा बाळाची विक्री सुरु होती. सात महिन्याच्या गर्भाचा सौदा अखेर पोलिसांनी हाणून पाडला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मेहुणी गर्भाशी होती. त्याचवेळी तिच्या नवऱ्यानं तिला टाकली. सात महिन्यांची ती असतांना तिच्या हुशार भावजींनी तिच्या बाळाचा सौदा ठरवला.दत्तक देण्याच्या नावाखाली हा ऑनलाईन सौदा ठरला होता. तिच्या भावजीचे नाव शिवशंकर तांगडे तर मुल विकत घेणाऱ्या बाईचे नाव निकिता खडसे आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती क्रांतीचौक पोलिसांनी ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे.

या प्रकरणाबाबत सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी विस्तृतपणे दिलेल्या माहितीनुसार, शिवशंकर तांगडे यांनी फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट टाकलक होती. त्यामध्ये म्हटले होते की, त्याची मेहुणी सात महिन्यांची गरोदर आहे. तिला तिच्या नवऱ्याने सोडले आहे. तिला दुसरं लग्न करायचे आहे. त्यामुळे मेहुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते बाळ दत्तक द्यायचे आहे. त्याबदल्यात शिवशंकरने छुप्या पद्धतीने पैशांचीही मागणी केली होती. शिवाय निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी पिपल्स अ‍ॅडॉप्शन ग्रुपमधून दत्तक मूल घेऊ इच्छिणाऱ्यांची यादी देखील मिळवली होती. तसेच त्यातील काहींशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करून आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने चर्चाही केली होती.

या संदर्भातील माहिती फेसबुकवर दिसताच शिवशंकर तांगडे याचा पत्ता सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी व त्यांच्या पथकाने शोधला. शिवशंकर तांगडे हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असून सध्या तो औरंगाबादजवळील रांजणगावातील शेणपुंजी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!