🕒 1 min read
मुंबई : रायपूर येथे दोन दिवसीय ‘धर्म संसद’ आयोजित करण्यात आली होती. रविवारी(२६ डिसें.) या संसदेचा समारोप झाला. तसेच मिळालेल्या माहितीनुसार या धर्म संसदेत अकोल्याच्या कालीचरण महाराज(Kalicharan Maharaj) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल(Mahatma Gandhi) अपशब्द वापरले. फक्त एव्हढेच नाही तर महात्मा गांधींवर शिवीगाळ करत त्यांनी महात्मा गांधींच्या हत्येबद्दल नथुराम गोडसेचे कौतुकही केले. या प्रकरणानंतर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह(Nasiruddin Shah) यांनी देखील प्रतिक्रिया दिली. परंतु, त्यांच्या प्रतिक्रियेवरून आता पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धर्म संसदेत साधु संतांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर प्रतिक्रिया देत नसीरुद्दीन शाह म्हणाले की,’जे काही होत आहे ते पाहून धक्का बसला. जे बोलत आहेत त्यांना हेसुद्धा माहिती नसेल की ते कशाबद्दल बोलत आहेत, ते कशाला आव्हान देतायत. हे एकप्रकारच्या गृहयुद्धासारखंच असेल. २० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशा प्रकारे संपवण्याची गोष्ट करू शकत नाही. हे लोक लढण्यासाठी तयार आहेत कारण आम्ही सर्व लोक इथलेच आहे, आमच्या अनेक पिढ्या इथं राहत असून इथेच शेवटचा श्वास घेत आहेत. जर याचा बदला घेण्यासाठी दुसऱ्या बाजुने आंदोलन सुरु झाले तर त्यामुळे मोठं नुकसान होईल’, असे ते म्हणाले.
ओवेसीच्या विधानावर मळी भरून बसले होते का तोंडात? pic.twitter.com/8d9Ebrrghk
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 30, 2021
दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी नसीरुद्दीन यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. यासंदर्भात भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’ओवैसींच्या विधानावर मळी भरून बसले होते का तोंडात?’, असा खोचक सवाल भातखळकरांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्याचं कुटुंबप्रमुख असलेलं मायबाप सरकार खरचं आपली जबाबदारी निभावतय का?’
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- क्विंटन डी कॉक खेळणार नाही पुढील दोन कसोटी सामने; ‘हे’ आहे कारण
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
