मुंबई : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.
भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. तर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.
आता शिवसेनेच्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मुद्द्यांसंदर्भात भाष्य केले. लव्ह जिहाद हा केवळ भाजपाचा अजेंडा आहे. भाजपा या मुद्द्यावरून केवळ शब्दांचा खेळ करताना दिसत आहे. लव्ह जिहाद कुठे झालाय? हे आम्ही भाजपाला नक्कीच दाखवून देऊ. पण लग्न हा मुला-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. भाजपा नेते मात्र यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला.
यावर आता भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेत जोरदार हल्लबोल केला आहे. ‘अलीकडे शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्या विचारावर चालण्याचा निश्चिय केलेला दिसतोय… हा आहे नवब्रिगेडी हिंदुत्ववाद…’ अस ट्विट करत भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे.
अलीकडे शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांचे विचार बासनात गुंडाळून कन्हैया कुमार, उमर खालिद यांच्या विचारावर चालण्याचा निश्चिय केलेला दिसतोय… हा आहे नवब्रिगेडी हिंदुत्ववाद…https://t.co/mj9rlqTrFo
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 21, 2020
महत्वाच्या बातम्या
- हजारे म्हणाले, तालुक्यातील निवडणुका बिनविरोध करा; मात्र नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी!
- ‘मराठा समाजातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या राऊत यांच्या वक्तव्याची चौकशी करा’
- आमचे मुख्यमंत्री फडणवीसच, आशिष शेलारांची सारवासारव…
- ‘ऊर्जामंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्क म्हणून काम करावं’
- हिंदुत्व सहिष्णू, त्यामुळेच ओवेसी अजूनपर्यंत सुरक्षित आहेत – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

