सिंधुदुर्ग:- भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन होणार आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार असून शहा सिंधुदुर्गात येऊन काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागले आहे.
आज दुपारी 2 वाजता अमित शहा यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या लाईफटाइम मेडिकल कॉलेजचा उद्घाटन सोहळा पार पडेल. आज दुपारी बरोबर 1.50 वाजता शहा हे गोवा येथे पोहोचतील. तिथून हेलिकॉप्टरने ते पडवे-कसाल येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज परिसरात येतील. या सोहळ्या निमित्ताने शहा तब्बल दोन तास सिंधुदुर्गात थांबणार आहेत. कार्यक्रमानंतर ते राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करतील.
दरम्यान, एकीकडे नारायण राणे महाविकासआघाडीचे सरकार पडेल, असे भाकीत करत असताना काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह हे मात्र राणेंच्या कार्यक्रमासाठी कणकवलीत गेले आहेत. विशेष म्हणजे कृपाशंकर सिंह यांचे स्वागत करण्यासाठी नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे कणकवलीत उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
नारायण राणे आणि माझे कौटुंबिक संबंध असल्याने मी या कार्यक्रमाला आलो आहे. यामागे कोणतेही राजकीय समीकरणं नाहीत, असे कृपाशंकर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अमित शहांच्या दौऱ्यानंतर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री असेल’
- आता एसबीआयचे रुपे जनधन कार्ड घ्या आणि मिळावा 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ
- टीम इंडियाला दुसरा धक्का, रोहित पाठोपाठ शुबमन गिल आऊट
- पोलीस दलातील ‘डॉन’ कालवश; दशकभर केली सेवा
- ‘सरकारी सवलतीला सोकावलेल्या सेलिब्रेटीनो जरा भान ठेवा, तुमचे बहुसंख्य फॉलोअर्स शेतकऱ्यांच्याच बाजूने’


