टीम महाराष्ट्र देशा : सध्याच्या बिकट काळात पोलीस आणि डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या लोकांना देशद्रोही ठरुवून त्यांच्यावर कारवाई करावी असे मत मुंबईतील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर अगदी संकटकाळात स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टर ,नर्स आणि रुग्णालयातील कर्मचारी अत्यावशक सेवा देत आहेत.पण काल रात्री आठच्या सुमारास मालेगाव येथे एम आय एम चे स्थानिक आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल व त्यांच्या २५ – ३० कार्यकर्त्यांनी चक्क मालेगाव इथल्या शासकीय रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर डांगे यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. आणि या मारहाणीचे कारण फक्त डॉ.डांगे यांनी फोन उचलला नाही म्हणून मारहाण केली.यावर डॉ.डांगे यांच्या म्हणण्यानुसार रुग्णालयात दोन कोरोना चे संशयित रुग्ण आहेत.त्यांच्यावर उपचार करण्यात व्यस्त असतांना मला हे फोन आले आहेत.
या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देतांना खासदार शेवाळे यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, याच विषयावर समाजातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्याचे कृषिमंत्री आणि मालेगाव ग्रामीणचे आमदार दादाजी भुसे यांनी मारहाण करणाऱ्यांवर तीव्र कारवाई करावी अशी मागणी केली आहे.तर समाजाच्या विविध स्तरातून अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.


