मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी सामिया गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. यानुसार अर्णब गोस्वामी पत्नीसोबत स्टुडिओमधून आपल्या घरी परतत असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केला. रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.
#UPDATE 2 people arrested in connection with the attack on Arnab Goswami & his wife. FIR registered by NM Joshi Marg Police station under sec 341 (Punishment for wrongful restraint) and 504 (Intentional insult with intent to provoke breach of the peace) of IPC: DCP Zone 3 #Mumbai https://t.co/zBarBKk4m6
— ANI (@ANI) April 23, 2020
याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे.
अर्णब गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “एक दुचाकी सलग त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. दुचाकी जवळपास गाडीच्या सोबतच होती. नंतर त्यांनी गाडी थांबवण्याच्या हेतूने दुचाकी गाडीसमोर आणली. यानंतर त्यांच्यातील एकजण गाडीजवळ आला आणि माझ्याकडे बोट दाखवत खिडकीवर हात आदळू लागला. खिडकीची काच फोडण्याचा त्याचा प्रयत्न होता. यावेळी त्याने आपल्याकडील द्रव गाडीवर फेकलं”.
या प्रकरणावर विविध स्तरातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणाची गंभीर दाखल पोलिसांनी घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.दरम्यान हल्ल्यात अर्णब गोस्वामी आणि पत्नी सामिया गोस्वामी यांना सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

