मुंबई : ऑलिम्पिक स्पर्धा ही जागतीक स्तरावरील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातील खेळाडू देशासाठी पदक पटकावण्यासाठी येतात. अनेक खेळाडूतून काही मोजक्याच खेळाडूंना पदक जिंकण्याची संधी मिळत असते.
अशीच एक संधी कतारचा अॅथलीट मुताज एस्सा बारिशमला आली होती. मात्र सुवर्ण पदक पटकावण्याची संधी असताना मुताजने त्याने जे केलं त्याने सुवर्ण पदक तर पटकावलेच पण संपुर्ण जगातील क्रीडारसिकांचे मनदेखील जिंकले. टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत ही घटना घडली. या स्पर्धेत सुवर्णपदकासाठी कतारचा मुताज बरिशम आणि इटलीचा गियानमार्को तांबेरी या दोन खेळाडूंत स्पर्धा होती. यावेळी दोघांनी २.३७ मीटर उंच उडी मारली. यामुळे दोन्ही खेळाडू पहिल्या क्रमांकावर आले.
यामुळे सामनाधिकाऱ्यांनी दोघांना प्रत्येकी ३-३ उडी मारायला सांगितले. मात्र दोघापैकी एकही खेळाडू २.३७ पेक्षा उंच उडी नाही मारु शकला. यामुळे अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्यासाठी दोन्ही खेळाडूंना एक-एक उडी मारायला सांगितले. मात्र यावेळी तांबेरी जखमी झाल्याने त्याने माघार घेतली. यामुळे सुवर्णपदकाचा मान हा मुताजकडे चालुन आला. मात्र यावेळी मुताजने अधिकाऱ्यांना प्रश्न केला की जर मी पण स्पर्धेतुन माघार घेतली तर काय? यावर अधिकाऱ्यानी सांगितले की सुवर्णपदक दोघांना विभागून देण्यात येईल. तेव्हा मुताजने माघार घेत असल्याचा निर्णय कळवला.
यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी खेळाडू तांबेरीलादेखील सुवर्णपदकाचा मान मिळाला. या ऐतिहासिक क्षणानंतर मुताजन म्हणाला की,’खेळात केवळ जिंकणे एवढच सर्वस्व नसतं, प्रतिस्पर्ध्याचा सन्मान करणे हाही एक खेळाचा भाग आहे. आज मी जे केलं हे येणाऱ्या पीढीसाठी एक संदेश आहे की खेळ कसा खेळायचा.’ या निर्णयानंतर तांबेरीने मुताजची गाळाभेट घेतली. मुताजच्या या निर्णयाने त्याने जगभरातील क्रीडा रसिकांची मने जिंकली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज्यपालांकडून सरकारी कामात ढवळा ढवळ ; राज्यात सत्तेची दोन केंद्र करण्याचा प्रयत्न’
- ‘तळाच्या फलंदाजानी केलेल्या २०-३० धावांही निर्णायक असतात’, अजिंक्य रहाणे
- ‘या’ कारणामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध
- मराठा समाजासाठीची ३६ पैकी १४ वसतीगृहे सुरु; अशोक चव्हाणांनी दिली माहिती
- ‘राज्यपालांना वाटतंय ते अजूनही मुख्यमंत्रीच आहेत’ ; मलिकांचे राज्यपालांवर टीकास्त्र


