🕒 1 min read
मुंबई : मुंबई सेंट्रल स्थानकाला १९ व्या शतकातील समाजसेवक नाना शंकरशेठ यांचे नाव देण्या संबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार आता मुंबई सेंट्र्ल स्थानकाचे नामांतर नाना शंकरशेट टर्मिनस असे करण्यात येईल. पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकाचे आता नामांतर होणार आहे.
परंतु आता समाजसेवक नाना शंकरशेठ यांच्या नावाला केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता विरोध केलेला आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस हे पश्चिम रेल्वे वरील महत्वाचे टर्मिनस असल्यामुळे या टर्मिनस ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावी अशी मागणी मागील १५ वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाने केली होती. मात्र आता अचानक राज्य सरकार ने मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई सेंट्रल ला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याच्या ठरावाचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल ला देण्या ऐवजी ग्रँट रोड रेल्वे स्टेशन ला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना ना. रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला केली आहे.
या सुचने साठी लवकरच ना रामदास आठवले केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे ही आंबेडकरी जनतेची व रिपब्लिकन पक्षाची अनेक वर्षांपासून मागणी आहे.
मुंबईत व्हिटी स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे तसेच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. मुंबई सेंट्रल ला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी आंबेडकरी जनतेची मागणी आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार, अधूनिक भारताचे निर्माते, समतेचे मानव अधिकाराचे जागतिक स्तरावरील महान क्रांतिसूर्य म्हणून त्यांचे योगदान युगप्रवर्तक ठरले आहे.त्यामुळे मुंबई सेंट्रल सारख्या महत्वपूर्ण रेल्वे टर्मिनसला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे.
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव दिले पाहिजे. राज्य सरकार ने मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याच्या केलेल्या ठरवाचा पुनर्विचार करावा.ग्रँट रोड रेल्वे स्टेशनला नाना शंकर शेठ यांचे आणि मुंबई सेंट्रलला डॉ.आंबेडकर यांचे नाव द्यावे
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) March 13, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
