Share

लोणी खुर्द येथे लोक वर्गणीतून शेतकऱ्यांनी रस्ता केला मोकळा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : लोणी खुर्द येथे गाव रस्ते, पांदन रस्ते,शिवार रस्ते व पुर्वीपार वहिवाटी खाली असलेले रस्ते मोकळे करणे व शेतजमीनीत जाण्यायेण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी गाव रस्ता समिती नेमून प्रकरणे निकाली काढणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले जाते.

परंतु त्या पचाड्यात न पडता वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील शेतक-यांनी सामोपचाराने तोडगा काढला आणि एकत्रितपणे लोकवर्गणीतून मुरुम टाकुन एकदाचा तो तिडा संपुष्टात आणून एकमेकांना समजून घेऊन सर्वांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून एक आदर्श निर्माण केला.

याकामी येवला येथील सेवा निवृत्त आर्मी सेनेच्या कार्यकत्र्यांनी मध्यस्थी करून सामोपचाराने हा प्रश्न सोडवल्याने सर्वांनी समाधान व्यक्त करून आर्मी सेनेच्या कार्यकत्र्यांचे व ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपसरपंच आप्पासाहेब जाधव, रामभाऊ अवचिते, रऊफ सय्यद, नारायण सोमासे, कचरू सोमासे, येवला सैनिक ग्रुप अध्यक्ष सुशिल शिंदे, उपाध्यक्ष मेजर धनवटे, सचिव बाळासाहेब जाधव, मनोज सोनवणे, नवनाथ कावरे, सुदाम पवार आदी उपस्थीत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!