🕒 1 min read
पुणे– संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे. कोरोनाच्या लढ्यासाठी देशातील अनेक दिग्गज मंडळींकडून याचप्रमाणे कलाकारांकडून मदतीचे हात येत आहे.
पुणे येथील नानचंद भोगीला शाह (वय-८६ वर्षे), पत्नी सुमन नानचंद शाह (वय-७९ वर्षे) यांच्या लग्नाच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीने व मुलगा अजय नानचंद शाह, नातु रोहन संदीप कुमार शाह यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश व मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ११ हजार १११ रुपयांचा धनादेश असे एकुण २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
दरम्यान,दरवर्षी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणारा धार्मिक कार्यक्रम रद्द करुन देशहिताला महत्व देत शाह कुटुंबियांनी आर्थिक मदत देऊ केली. या संकल्पनेबाबत पुणे गोडीजी पार्श्वनाथ टेबल ट्रस्टचे चेअरमन अशोक पोपटलाल शाह व संपादक शैलश गुजर यांनी सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
