Share

सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलारांकडून बिनबुडाचे आरोप – अशोक चव्हाण

Published On: 

मुंबई: कमला मिल दुर्घटनेला सरकार आणि मुंबई महापालिकेचे भ्रष्ट प्रशासन जबाबदार असून सरकारचे अपयश झाकण्यासाठी आशिष शेलार यांच्याकडून बिनबुडाचे आरोप केले जात आहेत अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केला आहे. आयटी पार्कला सवलती देण्याचे शासनाचे धोरण होते. या सवलतींचा कोणी गैरफायदा घेत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे.

एफएसआयचा गैरवापर होत होता तर, मुंबई महापालिका व राज्य सरकारने गेल्या तीन वर्षात कारवाई का केली नाही ? असा प्रश्न खा. चव्हाण यांनी केला. महापालिका आणि सरकारमधील लोकांनी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातल्यामुळेच ही दुर्घटना घडली असून याला राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजप नेते विरोधीपक्षांवर बिनबुडाचे आरोप करित आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!