Share

मनसेला सोबत घेण्याबाबत अशोक चव्हाणांच मोठं वक्तव्य

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मनसेला आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत काँग्रेस सकारात्मक असल्याचे संकेत काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. अशोक चव्हाण नागपुरमध्ये सोमवारी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला आघाडीत घेण्यात पक्षात मतभिन्नता होती. पण आता मत परिवर्तन झालं असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गरज भासल्यास आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचा आक्षेप नसल्यास काँग्रेस मनसेला आघाडीत घेण्यात सकारात्मक आहे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी यूपीए अध्यक्षा आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ सोनिया गांधी यांची नवी दिल्ली निवासस्थानी भेट घेतली. या पाश्र्वभूमीवर चव्हाण यांचे विधान महत्त्वाचे ठरते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!