Share

Ashok Chavan | काँग्रेस सोडण्याच्या चर्चेवर अशोक चव्हाण यांनी केला खुलासा! म्हणाले…

Published On: 

मुंबई : काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा आहे. ते काँग्रेस पक्षात असमाधानी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही बातमी प्रथम त्यांच्या नांदेड मतदारसंघात चर्चेत आली आणि हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनली. आता अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या वृत्ताबाबत खुलासा केला आहे.

आपण काँग्रेस सोडून कुठेही जात नसल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीच्या बातम्या निराधार आणि अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “अशा चर्चेला महत्त्व नाही. असा कोणताही निर्णय मी घेतलेला नाही”, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसने अशोक चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती-

फ्लोअर टेस्टच्या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह तीन आमदार उशिरा पोहोचल्याने त्यांना मतदान करता आले नाही. यानंतर काँग्रेसने अशोक चव्हाण यांना पक्षविरोधी कारवाई बाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. याच कारणामुळे अशोक चव्हाण हे आपल्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात असून नांदेडमध्ये त्यांनी पक्ष सोडल्याच्या बातम्या जोरात सुरू झाल्या आहेत. अशा स्थितीत अशोक चव्हाण यांनी आपले स्पष्टीकरण देऊन चर्चा संपविण्याचा प्रयत्न केला आहे.

अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवार, 2 ऑगस्ट) सांगितले की, “आज सकाळी नांदेडमध्ये मीडियासमोर मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडली. मी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या निराधार आहेत. मी असा कोणताही निर्णय घेतलेला नाही.” असंही चव्हाण यांना ट्विट करून स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!