🕒 1 min read
नंदुरबार : २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. सर्वाधिक आमदार येऊन देखील शिवसेनेनं ऐनवेळी साथ सोडल्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं असून भाजपच्या नेत्यांनी वेळेवेळी महाविकास आघडी सरकारवर विविध मुद्द्यांवरून हल्लाबोल केल्याचं दिसून आलंय.
आता भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी नंदुरबारमध्ये बोलताना अहिराणी भाषेतून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलंय. राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल, असा टोला शेलार यांनी लगावला. ते आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ‘आज नंदुरबारमधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. एका अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशनसाठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे. जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजूनही मंत्रालयात पोहोचले नाहीत ते नंदुरबारसारख्या अतिदुर्गम भागात कधी आणि कसे पोहचणार?’ असा सवाल देखील शेलार यांनी उपस्थित केला.
नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. 20 जुलैपर्यंत 3 लाख 5 हजार हेक्टरपैकी 1 लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली. मात्र, पावसानं दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पीक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. शेतीची, पाण्याची अडचण असताना पालकमंत्री गायब आहेत. आदिवांसींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवाल उपस्थित करत आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेसची शिवसेनेवर पुन्हा कुरघोडी; शिवसेनेच्या माजी राज्यमंत्र्याने केला काँग्रेसमध्ये प्रवेश
- ‘पूजा चव्हाण प्रकरणात गोत्यात आलेल्या संजय राठोडांना मंत्रिपद देण्याची शिवसेनेला घाई’, भाजपची टीका
- ‘केवळ विवाहासाठी धर्म-परिवर्तन चुकीचं’; अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलं ‘जोधा-अकबर’चं उदाहरण
- ‘पूरग्रस्तांना तातडीची मदत अजूनही मिळाली नाही तर पॅकेजचं काय?,’ आशिष शेलार यांची टीका
- पूरग्रस्तांना मदत ते पूर संरक्षक भिंती; मंत्रिमंडळाचे आज महत्वाचे निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

