🕒 1 min read
मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोळशाचे इंजिन बघाच तो व्हिडीओने उघडे पडले. खोट्या आरोपांचे बुडबुडे क्षणात हवेत विरले ! अशी कविता ट्विट करून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या सभेत लाव रे तो व्हिडीओ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधत आहेत. दरम्यान मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडिओला बघाच तो विडिओ ने प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे यांनी यांच्या सभेत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरही आशिष शेलार यांनी दिले. आशिष शेलार यांनी ट्विटरवर कविता ट्विट करून राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
कोळशाचे इंजिन बघाच तो व्हिडीओ ने उघडे पडले. खोट्या आरोपांचे बुडबुडे क्षणात हवेत विरले ! आम्ही काहीच नाही वेगळे येथे केले, खोट्या समोर फक्त आम्ही आरसे धरले, विपर्यासाचे..ढोंगाचे आणि सोंगाचे खरे चेहरे क्षणात दिसू लागले ! आता आम्ही नाही,लोक बघा कसे हसू लागले ! अशी कविता त्यांनी ट्विट करून त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
कोळशाचे इंजिन "बघाच तो व्हिडीओ"ने उघडे पडले
खोट्या आरोपांचे बुडबुडे क्षणात हवेत विरले!आम्ही काहीच नाही वेगळे येथे केले
खोट्या समोर फक्त आम्ही आरसे धरले.
विपर्यासाचे..ढोंगाचे आणि सोंगाचे खरे चेहरे क्षणात दिसू लागले!
आता आम्ही नाही,लोक बघा कसे हसू लागले!#ChowkidarकेSideEffects— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) April 28, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
