🕒 1 min read
सोलापूर : सध्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसंच राज्यातही करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे.सोलापुरात करोनाबाधित नऊ रूग्ण वाढले. आतापर्यंत रूग्णसंख्या १११ झाली आहे. यात सहा मृतांचा समावेश आहे. तर, यशस्वी उपचारातून करोनावर मात केलेल्या दहा रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात ९५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सोलापुरात पहिला रूग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला होता. १९ दिवसांत रूग्णांची एकूण संख्या १११ पर्यंत पोहोचली आहे. यात ‘सारी’चा प्रादुर्भावही सुरू आहे.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसरीकडे हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यापैकी एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान,कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.
Ministry of Home Affairs issues order under the Disaster Management Act, 2005 to further extend the Lockdown for a further period of two weeks beyond May 4: MHA pic.twitter.com/Cw4bkdMTFU
— ANI (@ANI) May 1, 2020
येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठीच्या बैठका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. त्यानुसार मजुरांची ने-आण करण्यासाठी खास रेल्वेची व्यवस्था करण्याचे ठरले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

