प्रिया देसाई : वाचनवयाच्या सुरुवातीलाच रत्नाकर मतकरींसारखा लेखक बहुदा सगळ्यांनाच त्याच्या गुढकथांमधून भेटला. त्यांनी लिहिलेली कादंबरी, संपादन, ललीतलेख आणि मुख्य म्हणजे नाटक असे अनेक पैलू त्यांचे दमदार आहेत. १९५५ मधे, वयाच्या सतराव्या वर्षी, त्यांची ‘वेडी माणसं’ ही एकांकिका आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन प्रकाशित झाली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे लेखन अव्याहतपणे चालू होते.
मतकरींची ‘लोककथा ७८’, ‘दुभंग’, ‘अश्वमेध’, ‘माझं काय चुकलं?’, ‘जावई माझा भला’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘घर तिघांचं हवं’, ‘खोल खोल पाणी’, ‘इंदिरा ‘, आणि इतर अनेक नाटके नाट्य रसिकांच्या मनात कायम घर करुन आहेत. अलीकडेच ‘अलबत्या गलबत्या’ आणि ‘निम्मा, शिम्मा राक्षस’ या मुलांच्या, तसच महाभारतातल्या अंतिम पर्वावर आधारीत ‘आरण्यक’ या नाटकांनी रंगभूमी गाजवून सोडली. वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथा हा कथाप्रकार त्यांनी एकहाती वाचकांपर्यंत पोचवला.
मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजमधून घोर निराशा झाली : पृथ्वीराज चव्हाण
मोठ्यांसाठी सत्तर तर मुलांसाठी बावीस नाटकं, अनेक एकांकिका, वीस कथासंग्रह, तीन कादंबऱ्या, बारा लेख संग्रह, आपल्या रंगभूमीवरल्या कामाचा सखोल विचार करणारा आत्मचरित्रात्मक ग्रंथ ‘माझे रंगप्रयोग’ अशी त्यांची विपुल साहित्यसंपदा आहे. ‘गहीरे पाणी’, ‘अश्वमेध’, ‘बेरीज वजाबाकी’ या मालिका, तसच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपट ‘इन्वेस्टमेन्ट’, अशी त्यांची इतर माध्यमामधली कामंही रसिकप्रिय ठरली आहेत.
सहजता, वक्तशीरपणा, उत्स्फूर्तपणा ह्यांचा अगदी विरळा संयोग असणारे, प्रत्यक्ष समाजकार्यात उतरणारे व सामाजिक आंदोलनांना सक्रिय पाठिंबा देणारे, नवनव्या विषयांवर काम करत रहाणारा असा हा विरळा लेखक म्हणजे रत्नाकर मतकरी. रत्नाकर मतकरींना विपुल पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत. संगीत नाटक अकादेमी आणि साहित्य ॲकेडमी या दोन्ही मान्यवर संस्थांकडून पुरस्कारप्राप्त ठरलेल्या मोजक्या व्यक्तीमत्वात त्यांचा समावेश होतो.मतकरींसारखा लिहिता हात अचानक एक्झिट झाल्याने साहित्य आणि रंगभूमी या क्षेत्रात एक न भरुन येणारी पोकळी निर्माण करणारी ठरते.
5 वर्षाच्या विहानने केला एकट्याने दिल्ली ते बंगरूळ असा विमान प्रवास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
