Share

#व्यक्तिविशेष : मुख्यमंत्र्याचा विश्वास सार्थकी ठरविणारे शिवसेनेचे खा. राहुल शेवाळे

Published On: 

प्रा. नागेश वनकळसे/ मोहोळ : सध्या कोरोना ने जगभरात थैमान घातले आहे प्रत्येक जण आपापल्या परीने या महामारीशी तोंड देत आहे ,महाराष्ट्रात मुंबई शहराला सर्वाधिक विळखा या आजाराने घातला आहे.त्यातला बराच भाग दक्षिण मध्य मुंबईचा येतो. तिथे खासदार आहेत राहूल शेवाळे.

राहुल शेवाळे हे एखाद्या योद्धा प्रमाणे मैदानात पाय रोवून जनतेचे मनोबल तर वाढवतच आहेत परंतु प्रत्येक मदत जनतेपर्यंत कशी पोहचेल याची काळजी ते घेत आहेत.आदर्श लोकप्रतिनिधी प्रमाणे अविरतपणे त्यांची मेहनत दिवस रात्र सुरू आहे.

धारावी सारख्या अति लोकसंख्या असणाऱ्या झोपडपट्टी भागामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढलेला आहे अशा ठिकाणी हे तरुण खासदार जनतेसाठी उभा आहेत. सदर ठिकाणी कोरोनामुळे क्षती ग्रस्त भागात मोफत धान्य वाटप , सॅनिटायजरिंग, वेग वेगळ्या अकुशल कामगारांना त्यांनी आपापल्या परीने आणि स्वयंसेवी संस्था आणि शिवसैनिक यांना सोबत घेऊन तब्बल दोन महिने हे कार्य उत्कृष्ठ नियोजन करून अविरतपणे चालू ठेवले आहे तेही स्वता २४ तास फील्ड वर उतरून काम करीत आहेत असे कर्तव्य तत्पर खासदार प्रत्येकाला मिळावे.

कोणत्याही शेतकऱ्याला खते आणि बियाणे कमी पडू देणार नाही – कृषीमंत्री दादाजी भुसे
.
मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समीतीचे अध्यक्ष पद आणि नगर सेवक पद भूषविल्यामुळे सूक्ष्म पातळीवर काम करण्याचा अनुभव त्यांना प्रचंड आहे त्यामुळे आज या आणि बाणीच्या काळात शक्य तितकी मदत पोहोचवण्यात खासदार साहेब अग्रेसर आहेत. पी एम केअरला दिलेला स्वताचा खासदार फंड स्वताच्या मतदारसंघात खर्च करू द्या अशी मागणी त्यांनी केली म्हणजे आपल्या जनतेप्रति बांधील आणि जबाबदार प्रामाणिक नेतृत्वाची चुणूक येथे दिसली .

मुंबई सारख्या बलाढ्य शहरातील जुनी मुंबई असणारा दादर सारखा भाग त्यांच्या मतदारसंघात येतो तिथून ते अनुशक्तीनगर ,मानखुर्द पर्यंतचा ह्या मोठ्या भागापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ते रात्रीचा दिवस करीत आहेत .

मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी टाकलेला विश्वास सार्थकी लागला आहे ,सेनेला खा. राहुल शेवाळे यांच्या रूपाने एक हिरा (शिवसैनिक) मिळाला आहे. परंतु हे करत असताना खासदार साहेबांनी स्वताचीही काळजी घ्यावी. त्यांचं काम आणि कर्तृत्व सिद्धी पर्यंत जावो ही विठ्ठला चरणी प्रार्थना

अभिमानास्पद : कोरोनाचा पराभव करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बनले कोरोना योद्धा !

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!