प्रदीप मुरमे : भाजप नेते माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी विधान परिषद निवडणूकीत आपले कनिष्ठ बंधू अरविंद पाटील यांच्याऐवजी भाजप जिल्हाध्यक्षपदी असलेल्या रमेश कराड या कार्यकर्त्याच्या पारड्यात उमेदवारीसाठी आपले राजकीय वजन टाकून एका निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याला न्याय दिला !
त्याचं झालं असं की, विधान परिषद निवडणूकीसाठी भाजपमध्ये लातूर जिल्ह्यातून उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते.परंतु युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर व भाजप जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड या उभयतांमध्ये उमेदवारीसाठी खरी चुरस निर्माण झाली होती.साहजिकच संभाजीराव पाटील निलंगेकर हे भाजपमधील एक वजनदार नेते व माजी मंत्री असल्याने संभाजीराव हे या उभयतांमधील कोणाच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकतील त्या कार्यकर्त्याला विधान परिषद निवडणूकीची उमेदवारी मिळणार हे उघडच होते.
‘गांधी आणि वाड्रा यांनी तिजोरीचे दार थोडे किलकिले केले तरी कशाचीच गरज पडणार नाही’
अरविंद पाटील यांची मागील अनेक दिवसापासूनची आमदारकीची मनीषा व त्यांचे राजकीय करीअर विचारात घेता संभाजीराव हे आपले राजकीय वजन निश्चितच भावाच्या पारड्यात टाकून अरविंद पाटील यांना आमदारकीच्या बोहल्यावर बसवतील अशी अटकळ अनेक राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.परंतु सर्वच राजकीय जाणकारांचे अंदाज फोल ठरवत संभाजीराव यांनी भावाऐवजी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या पारड्यात आपले राजकीय वजन टाकले.
संभाजीराव पाटील यांचे राजकारण हे तसे नेहमीच धक्कातंत्राच राजकारण राहिलं आहे.या विधान परिषद निवडणूकीतही त्याची प्रचीती आली. शेवटच्या क्षणी भावाऐवजी कार्यकर्त्याला झुकतं माप देवून त्यांनी कराड यासारख्या कार्यकर्त्यास सुखद राजकीय धक्का दिला आहे.राजकारण करत असताना नेतृत्वाने कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. एवढेच नव्हे तर प्रसंगी त्यांना बळ दिले पाहीजे असेही बोलले जाते.संभाजीराव यांनी कराड यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष कृतीत उतरवून आपल्यातील नेतृत्व गुणाची एक झलक दाखवून दिली आहे.रमेशअप्पा कराड यांचा या उमेदवारीवर नाही म्हंटले तरी तसा त्यांचाच हक्क होता.मागील विधान परिषद निवडणूकीत लातूर-उस्मानाबाद व बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारीची मागणी केली होती.परंतु आयत्यावेळी त्यांची उमेदवारी डावलण्यात आली होती.
बच्चू कडू पोलिसांचं स्टिंग ऑपरेशन करायला गेले आणि….
दरम्यान, मागील विधानसभा निवडणूकीतही युतीच्या जागा वाटपात त्यांचा हक्काचा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शेवटच्याक्षणी शिवसेनेला सुटल्याने त्यांच्यावर मोठा राजकीय अन्याय झाला होता.दरम्यान कराड हे मागील दोन वर्षापासून गटातटाच्या राजकारणातून बाहेर पडून ते संभाजीराव यांच्या नेतृत्वाखालील सक्रीय होवून पक्ष वाढीच्या कार्यास त्यांनी स्वतःला वाहून घेतल्याचे सर्वश्रूतच आहे.या पार्श्वभूमीवर संभाजीराव यांनी देखील या विधान परिषद निवडणूकीत कराड यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना आमदारकीची मोठी गिफ्ट मिळवून दिली आहे.भावाची आमदारकीची मनीषा बाजूला ठेवत कार्यकर्त्याचा सन्मान करत त्यास आमदार करुन दिलेला शब्द पाळून आपल्या मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल भाजप गोटातून संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वगुणाचे मोठे कौतुक होत आहे,हे मात्र निश्चित !
पुढील वर्षात आम्ही ५ कोटी रोजगार निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

