Share

सोसायट्यांच्या मनमानी कारभाराला चाप, घरकाम करणाऱ्यांना प्रवेश नाकारता येणार नाही

Published On: 

मुंबई : या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना केल्या आहेत. मात्र गृहनिर्माण संस्थांच्या आवारात घर कामगार व वाहनचालकांना शासनाने प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या आवारात काम करणाऱ्यांना कामगारांना गृहनिर्माण संस्थांनी प्रवेश नाकारू नये, असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

Google Pay चा वापर करणं धोकादायक ? पहा, खरं काय आहे

पाटील म्हणाले, कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांमध्ये घर कामगार व वाहनचालक यांना गृहनिर्माण संस्थांच्या आवारात कामकाजाकरिता प्रवेश प्रतिबंधित केलेला नाही. मात्र काही गृहनिर्माण संस्था या कामगारांना प्रवेश प्रतिबंधित करत आहेत. तसेच गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी संस्थांच्या स्तरावर शासनाच्या निर्देशाच्या विपरीत नियमावली तयार करत असल्याच्या सभासदांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

‘कोरोनावर इंजेक्शन निघालं, पण ते आपल्याला परवडणारं नाही’

कामगारांना प्रवेश देण्यासंदर्भात गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.तसेच शासनाच्या नियमांच्या विपरीत गृहनिर्माण संस्थांनी नियम तयार करू नयेत आशा सूचनाही पाटील यांनी केल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!