Share

Google Pay चा वापर करणं धोकादायक ? पहा, खरं काय आहे

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर असल्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवहार हे मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. डिजिटल पेमेंटसाठी भारतात मोठ्या प्रमाणात गुगल पे हे अॅप वापरलं जातं. मात्र सोशल मीडियावर गुगल पेचा वापर करणं महागात पडू शकतं. सुरक्षितता धोक्यात येऊ शकते अशा आशयाचा मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. यावर आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सोशल मीडियावर व्हायरल झालेला गुगल पे बाबतचा स्पष्टीकरण दिल आहे.

गुगल पेने एक निवेदन जारी केले आहे ज्यामध्ये असे गूगल पे भारतात अधिकृत आहे आणि देशातील अन्य मान्यताप्राप्त UPI अॅप प्रमाणेच कायदेशीर असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ‘आम्ही सोशल मीडियावर शेअर झालेल्या काही गोष्टी पाहिल्या. ज्यामध्ये गुगल पेद्वारे पैसे ट्रान्सफर करणं हे कायद्याने सुरक्षित नाही असं म्हटलं आहे. तसेच हे अॅप अनअधिकृत असल्याचंही म्हटलं आहे. मात्र हे खरं नाही. गुगल पे हे थर्ड पार्टी अॅप आहे. पण पेमेंट्स पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित केले जातात. NPCI च्या वेबसाईटवर हे तुम्ही व्हेरिफाय करू शकता.’ अशी माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.

गुगलच्या प्रवक्त्यानी गुगल पे प्लॅटफॉर्मवरुन पैसे ट्रान्सफर करताना काही अडचण आल्यास कायद्याद्वारे ती सोडवली जाऊ शकत नाही कारण हे अॅप अनधिकृत आहे. हा फिरणारा मेसेज चुकीचा असल्याची माहिती दिली आहे. RBIने कोर्टाच्या सुनावणीत असं कुठेही म्हटलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

स्लो इंटरनेट असेल तरी लुटता येणार व्हिडिओचा आनंद

व्हॉट्सॲपचे बनावट ॲप 10 लाख वापरकर्त्यांकडून डाऊनलोड

घाबरू नका, बँका व वित्तीय संस्था बंद राहणार नाहीत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!