🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी भारतात मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन घोषित केलेला आहे. अर्थव्यवस्था संकटात सापडलेली आहे. यावर उपाय म्हणून सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे, असा सल्ला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
#Stimulus @PMOIndia सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. #WorldGoldConcil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2020
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे.केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या या पर्यायवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर भाजप नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रस्तावावर टीका केली आहे. यामध्ये काँग्रेसचा हिंदू मंदिरांप्रतीचा आकस व दुजाभाव स्पष्ट दिसतोय अशी टीका केली आहे. यावर आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एकीकडे कोरोना संकटामुळे सामान्य माणसाला आर्थिक चटके बसू लागले आहेत. त्याच वेळेस सरकारी तिजोरीत सुद्धा खडखडाट आहे. यावर एक उपाय म्हणून देवस्थानातील सोने हे तात्पुरते वापरून ही अडचण सोडवावी अशी भूमिका काही जण घेत आहेत. जनसामान्य हा पुण्य म्हणून दानधर्म करत असतो व त्यामागची भावना ही दीन दुबळ्याना मदतीची असतेच. त्यामुळे खरेतर देशप्रेम ,राष्ट्रप्रेमाच्या गोष्टी बोलणाऱ्या भाजप ने यावर सकारात्मक विचार करायला हवा.
भाजपला महसूल कमाईसाठी दारू दुकानांना परवानगी देताना त्यांना काहीही वाटत नाही, मात्र देवस्थानातील सोने गरिबांच्या कल्याणासाठी आणि तेही तात्पुरते वापरण्यास विरोध हा त्यांचे खरे स्वरूप दाखवणारा आहे. तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे ‘भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान ‘ अशी भूमिका भाजप घेते आहे.या नेत्यांना आता जनता माफ करणार नाही, असे मुकुंत किर्दत म्हणाले आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
