मुंबई : ‘तेरा बाप है वो..?’ म्हणत अभिनेते अनुपम खेरच्या आईचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावेळी देखील त्यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आई आणि मुलाच्या या मजेशीर व्हिडिओमुळे पुन्हा एकदा अनुपम चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी अनुपम यांनी असा प्रश्न विचारला की आई दुलारीने खोचक बोलून मजेशीर उत्तर दिलं आहे.
https://www.instagram.com/p/CUtnH-ll9PI/?utm_medium=copy_link
दरम्यन अनुपम यांनी आपल्या आईसोबत चर्चा करतांना तसेच खरेदी केलेल्या कपड्यांबद्दलचा तो व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अनुपम यांची आई गिफ्ट म्हणून काही टी-शर्ट आणि शर्ट देतात. अनुपम यांना ते शर्ट आवडतात आणि ते बोलतात की हे सगळे माझ्यासाठी आहेत की मला यातून एक घ्यायचं आहे. यावर त्यांची आई बोलते, सगळे आवडले असतील तर सगळे घे, तुझ्यापेक्षा दुसर काय महत्त्वाच आहे. अनुपम बोलतात पैसे दिले की नाही. हे ऐकताच त्यांची आई खोचकपणे बोलते, ‘शर्ट देणारा तुझा बाप होता का..?’ तो असाच देईल. पुढे त्या बोलतात की १० ते २० हजार लाख रुपये दे.
हा व्हिडीओ शेअर करत, “आईने माझ्यासाठी काही शर्ट आणले. हे एक देण्याची आणि घेण्याची एक सोपी पद्धत असायला पाहिजे होती. मात्र दुलारीच्या बाबतीत ते शक्य नाही. तिला दुसऱ्या गोष्टींविषयी विचारलं की ती आमच्या संवादात गरज नसताना माझ्या बापाला घेऊन येते,’ असे कॅप्शन अनुपम यांनी दिले आहे. या मजेशीर व्हिडिओला भरपूर कमेंटस् आल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

