Share

मोदी सरकारमधील आणखी एक केंद्रीय मंत्री कोरोना पॉजिटीव्ह

Published On: 

नवी दिल्ली-  देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 28 लाखांपेक्षा अधिक वाढला आहे. कोरोनाच्या विळख्यात अनेक व्हीआयपी लोक देखील अडकले आहेत. मोदी सरकारच्या अजून एका मंत्र्यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राजस्थानच्या जोधपूरचे प्रतिनिधीत्व करत असून मोदी सरकारमधील ते चौथे कोरोनाबाधित मंत्री आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान व अर्जनराम मेघावाल हे बाधित झाले आहे. जोधपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र जोशी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शेखावत यांची तपासणी करण्यात आली.

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘प्रकृती अस्वास्थ्यामुळे व काही लक्षणे दिसल्याने मी कोरोना चाचणी केली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आयसोलेट व्हावे आणि चाचणी करून घ्यावी’, असे आवाहन गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले आहे.

दरम्यान,सतलज, यमुना नद्या जोडणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची मंगळवारी भेट घेतली होती. आता त्यांनी देखील स्वतःला आयसोलेट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘त्या’ निविदेसाठी माझ्या मुलानं पदाचा गैरवापर केला नाही – किशोरी पेडणेकर

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!