Share

ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांना कोरोनाची लागण झाली आहे. अस्लम शेख यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली आहे. ‘मी कोरोना पॉझिटिव्ह आढळलो आहे. मला सध्या कोणतीही लक्षणे नसून स्वत:ला विलग (आयसोलेट) करुन घेत आहे. माझ्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घ्यावी’ अशी विनंतीही अस्लम शेख यांनी केली. ‘मी माझ्या राज्यातील लोकांची सेवा करण्यासाठी घरातून काम करत राहणार आहे.’ असेही अस्लम शेख यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक सवर्सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी,राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता शिवसेनेचे धडाडीचे आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

आमदार नरेंद्र दराडे यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांसह इतर अधिकाऱ्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. नरेंद्र दराडे हे येवला शहरात राहतात. काही दिवसांपूर्वी ते नातेवाईकांच्या घरी सांत्वनासाठी गेले होते. त्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजले. यानंतर दराडे यांनी तातडीने कोरोना तपासणी केली.

त्या तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दराडे यांनी उपचारासाठी मुंबईत धाव घेतली. त्यांच्यावर पुढील तपासणीनंतर लीलावती किंवा फोर्टिस रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली.

भाजपाच्या दूध आंदोलनावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचे गंभीर आरोप

दरम्यान, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचीही काल कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल येईपर्यंत सगळं सोनई गाव चिंतेत होतं. मात्र सुदैवाने त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि नागरिकांचा जीव भांड्यात पडला. शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनिता गडाख यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शंकरराव गडाख यांनी स्वत: हून क्वारंटाइन झाले आहेत. सुनिता गडाख यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

काल राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना विषाणु संसर्ग झाला आहे. औरंगाबाद येथे करण्यात आलेल्या रॅपीट अॅन्टीजन टेस्टमध्ये ही धक्कादायाक बाब समोर आली आहे. आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.

जनतेचं हे अलोट प्रेम हीच पवार साहेबांची उर्जा – सुप्रिया सुळे

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!