Share

जनतेचं हे अलोट प्रेम हीच पवार साहेबांची उर्जा – सुप्रिया सुळे

Published On: 

सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढतच आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कालपासून 10 दिवसांच्या कडक लोकडाऊनला सुरुवात झाली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विनंतीवरुन पवारांनी दौऱ्याचे नियोजन केले. आरोग्यमंत्री राजेश टोपेही शरद पवार यांच्यासोबत आहेत.

मात्र आता या कोरोना आढावा दौऱ्याच्या निमित्ताने शरद पवार यांनी माळशिरस तालुक्यासोबतच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची विस्कटलेली घडी पुन्हा नव्या जोमाने बसवायचे मनोमन ठरवले असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आज शरद पवार हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंढरपूर तालुक्यातील बाजीरावची विहीर येथे शेळवे गावालगत शरद पवारांचा भरधाव जाणारा ताफा अचानक थांबला.

शरद पवारांचा ताफा थांबवण्याचे कारणही तसेच होते. शेळवे गावात राहणारे 87 वर्षांचे पांडुरंग गाजरे हे शरद पवारांना खूप प्रेम करतात. ज्या ज्या वेळी शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर येतात तेव्हा आवर्जून गाजरे यांची भेट घेत असतात. त्यामुळे महामार्गावर राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांसह पांडुरंग गाजरे हे उभे होते. कार्यकर्ते राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन उभे होते. दूरुनच पवारांना याचा अंदाजा आला आणि त्यांनी ताफा थांबवण्यास सांगितले. यावेळी पवारांच्या गाडीत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे सुद्धा होते.

‘राम मंदिराचा पाया शिवसेने रचला, उद्धव ठाकरेंना निमंत्रण देण्याचा अधिकार आयोजकांचा’

शरद पवारांनी गाडीतूनच पांडुरंग गाजरे यांची आपुलकीने विचारपूस केली. तब्येची माहिती जाणून घेतली. पांडुरंग गाजरे यांनी एक निवदेनही दिलं, पवारांनी त्यांचं निवदेनही स्वीकारलं. त्यानंतर शरद पवारांचा आला तसा ताफा पुन्हा सुसाट वेगाने पुढच्या दिशेनं निघाला. शरद पवारांचा ताफा थांबलेला पाहून कार्यकर्तेही भारावून गेले होते.

दरम्यान यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ आदरणीय शरद पवार साहेबांवर प्रेम करणारी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली आहेत.पंढरपूर येथे त्यांनी आपली वाट पाहत असलेल्या ८७ वर्षीय पांडुरंग गाजरे यांची गाडी थांबवून विचारपूस केली. जनतेचं हे अलोट प्रेम हीच खऱ्या अर्थाने त्यांची उर्जा आहे.ते असंच कायम राहो हीच सदिच्छा’. अस ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘सोलापूर जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध’, या शहराचे मी काही देणे लागतो – शरद पवार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!