Share

तुमच्या शुभेच्छांनी अधिक समर्पित होऊन काम करण्याचे बळ मिळाले – अजित पवार

Published On: 

मुंबई : आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत झालाच, शिवाय महाराष्ट्रासाठी अधिक समर्पित होऊन काम करण्याचं बळ मिळालं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्तं शुभेच्छा दिलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार त्यांनी आज वाढदिवस साजरा केला नाही. मात्र, दूरध्वनीद्वारे तसेच डिजिटल माध्यमातून आलेल्या शुभेच्छांचा त्यांनी आवर्जून स्विकार केला. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे आभार मानताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या सर्वांच्या सदिच्छा माझ्यासाठी मोलाच्या असून वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात या सदिच्छांनी मला नेहमीच बळ दिलं आहे. या सदिच्छा कायम माझ्यासोबत असतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

शरद पवारांच्या पायाला पुन्हा भिंगरी, सोलापूर नंतर ८० वर्षाचा योद्धा नाशिकच्या दौऱ्यावर…

उपमुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानताना राज्यातील जनतेनं कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू मार्गदर्शक सूचना, आदेश, नियमांचं काटेकोर पालन करुन नागरिकांनी स्वत:च्या, कुटुंबाच्या तसंच सार्वजनिक आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहनही केलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक मान्यवरांनी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतकांनी, तसेच सर्वसामान्य जनतेनंही प्रसारमाध्यमांमध्ये, समाजमाध्यमांमध्ये लेख, अनुभव लिहून उपमुख्यमंत्र्यांबद्दल आदर, स्नेह, आपुलकी व्यक्त केली आहे. या सर्वांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. वाढदिवसानिमित्ताने आरोग्य शिबिरांचे आयोजन, वृक्षारोपण कार्यक्रम, गरजूंना मदतीसारखे सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्र्यांनी या सर्व सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले आहेत.

भरती आणि पदोन्नतीतील मागासवर्गीयांच्या संविधानिक अधिकारांची जपणूक व्हावी – नाना पटोले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!