Share

आंदोलन करणा-या शेतक-यांवरील गोळीबार निषेधार्हच – अण्णा हजारे

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील शेतकऱ्यांवरील गोळीबार हे महाराष्ट्र सरकारच्या असंवेदनशीलतेचे संकेत असल्याची टीका अण्णा हजारे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याऐवजी त्यांच्यावर विशेषतः त्यांच्या शरीराच्या वरच्या भागावर गोळीबार करणे हे अतिशय निषेधार्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले. ज्येष्ठ गांधीवादी आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळीतील अण्णा हजारे यांनी उद्धव मापारी (३२)आणि बाबूराव डुकरे(४५) या घोटण येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या ऊस शेतक-यांना भेटण्यासाठी मॅक्सकेअर हॉस्पिटल, अहमदनगरला भेट दिली. या भेटीनंतर अण्णा यांनी रेडिओ नगर या वाहिनीला विशेष मुलाखत दिली.

यावेळी अण्णा हजारे यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे.’ भ्रष्टाचार आणि गरिबी निर्मूलन करण्याचा दावा करणारे सरकार आपली क्षमता सिद्ध करू शकत नाही. त्यांनी संसदेत असलेल्या बहुमताचा गैरफायदा घेऊन लोकपाल विधेयक त्वरित संमत घेतले. सध्याच्या भाजप सरकारच्या कामकाजासंबंधी तीन वर्ष पाळलेल्या शांततेबद्दल बोलताना अण्णा म्हणाले की, या सरकारला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काही वेळ दिला जावा असे वाटल्यामुळे मी मौन पाळले. दुर्दैवाने ते आपल्या वचनांनुसार वागू शकत नाहीत. म्हणूनच अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या, युवकांना आणि असंघटित क्षेत्रातील प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी चळवळ आखली आहे. अण्णांच्या या चळवळीत सद्यस्थितीत बदल घडवून आणण्याची इच्छा असलेली युवा शक्ती सहभागी होईल असा विश्वास अण्णांनी व्यक्त केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!