मुंबई : जगभरात कोरोनामुळे दहशतीचे वातावरण आहे. राज्यात देखील कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभुमीवर सोशल मिडीयावर अनेक अफवांना पसरवले जात आहे.
अशीच एक अफवा पाळीव प्राण्यांच्या संदर्भात पसरली असून या अफवेमुळे अनेक पाळीव प्राण्यांना लोक सोडून देवू लागले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या जी.प. सदस्या अंकिता पाटील यांनी या संदर्भात पोस्ट करून जनतेला असे न करण्याचे आवाहन केले आहे.
https://www.facebook.com/Ankitaharshvardhanpatil/posts/2660870070705415
अंकिता पाटील आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणतात, मांजर व कुत्र्यांमुळे कोरोना विषाणूंचा संसर्ग होतो ही अत्यंत चुकीची माहिती आहे. कृपया आपल्या पाळीव प्राण्यांचा व भटक्या कुत्र्यांचा आणि मांजरींचा त्याग करू नका.ते या विषाणूचे वाहक नाहीत. सोशल मीडियावर काही व्हिडिओ पाहून खुप निराशा झाली. सामाजिक अंतर हे आपल्या प्राण्यांनसाठी नाही. सावधगिरी बाळगा, काळजी घ्या पण अफवांण वरती विश्वास ठेऊ नका .
दरम्यान, कोरोनाचे राज्यात काल एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची स्ख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत.
दरम्यान,कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत.पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत,त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

