🕒 1 min read
मुंबई : अंजलीसे खट्टी-मिठी बाते करो, दमानियांसोबत किळसवाणा केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंजली दमानिया यांनी आपल्याला वेगवेगळ्या नंबरवरुन अश्लील फोन येत असल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी सार्वजनिक ठिकाणी पत्रक चिकटवून आपला क्रमांक जाहीर करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
‘हे अत्यंत किळसवाणं आणि राजकारणी कुठल्या थराला पोहचू शकतात याचं घाणेरडं उदाहरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून ओंगळवाण्या माणसांकडून मला नको त्या वेळी फोन येत आहेत. या व्यक्ती जळगाव, भुसावळ, सुरत, गोरखपूरमधील आहेत. नुकताच मला भुसावळला जाणाऱ्या पॅसेंजरमधून फोन आला. ही ट्रेन आता चाळीसगावला आहे’ अशी माहिती अंजली दमानिया यांनी ट्वीटवर दिली आहे. रेल्वे मंत्रालयाकडून या प्रकरणाची तात्काळ दखल घेण्यात आली असून मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
This is the disgusting and sick level to which politicians can fall. Last 3 days I have been harassed by calls from Jalgaon, Bhusawal, Surat, Gorakhpur at all odd hours from sick people. Just now a man called from a passenger heading towards Bhusawal which is now at Chalisgain pic.twitter.com/P3HKLiHVcB
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 28, 2018
I thank the railways and the railway police for their prompt reply @rpfcrbsl @WesternRly @dcmbsl @drmcrngp @rpfcr @Central_Railway @rpfcrbb pic.twitter.com/3YZJ85rbR1
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) April 28, 2018
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
