Share

आम्ही कोणालाही सोडणार नाही ! कोरोनाच्या काळात सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ : देशमुख

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने अनेक गुन्हे होण्याचे प्रमाण घटले आहे. या दिवसांमध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मात्र चांगलेच वाढले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. एका व्हीडीओच्या माध्यमातून गृहमंत्री देशमुख यांनी सायबर गुन्ह्यांवर भाष्य केले.

जेव्हापासून महाराष्ट्रात लॉकडाउनला सुरुवात झाली, तेव्हापासून राज्यातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व टिकटॉकचे व्हिडिओ असतील, या सर्वांच्या माध्यामातून भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणे, अफवा पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे इत्यादी सर्व चुकीच्या गोष्टी आहेत, असे देशमुख म्हणाले.

तर मध्यंतरी टिकटॉकच्या माध्यमातून बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यांसारख्या घटनांना प्रोत्साहन मिळेल, असे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. मी सांगू इच्छितो की, अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणे अत्यंत चुकीचे आहे. या सर्वांवर महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाची करडी नजर आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या 

#corona_update : कोल्हापुरात कोरोनाचे एकाच दिवसात 23 रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 259

तुळजापूर : रुग्णालय उभे करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा : आ.राणाजगजीतसिंह पाटील

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!