Share

शपथ घेताच उदयनराजेंचा ‘जय भवानी…जय शिवाजी’चा नारा,सभापतींकडून समज…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.

देशात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. या लॉकडाऊनच्या काळात संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. दरम्यान या सोहळ्यासाठी आज संसदेची दार उघडण्यात आली. देशभरातील एकूण ६२ खासदार निवडून आले असून त्यांचा शपथिविधी सोहळा हा अधिवेशनात पार पडणार आहे. आज केवळ काही मोजक्याचं नेत्यांनी शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, मल्लिकार्जुन खर्गे आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे.

प्रशासनाचा भोंगळ कारभार; पुण्याबाबत घडली ‘ही’ मोठी चुक

महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.

उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.

मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, उद्या नगर- औरंगाबाद महामार्ग बंद

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!