मुंबई : भाजप मध्ये जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. एमआयडीसीची कथित जमीन माझ्या बायको आणि जावयाने घेतली, मी मंत्री असताना माझ्या कुटुंबाने व्यवहार करायचे नाहीत का? समजा अमृता फडणवीसजी यांनी व्यवहार केला, तर तो काय देवेंद्र फडणवीस यांनी केलेला पदाचा गैरवापर होतो का? असा प्रतिप्रश्न भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विचारला. एमआयडीसी जमीन प्रकरणात खडसेंना राजीनामा देण्याची वेळ आली, असा दावा फडणवीसांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी हि प्रतिक्रिया दिली आहे.
यावर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘तुम्ही खत्री बाळगा एकनाथ खडसेजी, तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नहीं ! सबका भाला हो !’ अस म्हणत अमृता फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर शरसंधान साधलं आहे.
तुम्ही खात्री बाळगा @EknathKhadseBJP ji , तुमच्या जीवनातून खूप कही शिकल्या मुळे मी अशी चूक करणार नहीं ! सर्वांचे भले होवो ! @BJP4Maharashtra https://t.co/VR9HFPHmi0
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 11, 2020
दरम्यान, दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या या आरोपांना उत्तर देण्याचे फडणवीस यांनी टाळले असून ‘मी घरची धुनी रस्त्यावर धूत नाही’, असा टोला देखील फडणवीसांचा खडसेंना लगावला आहे. हॅकर मनीष भंगाळे प्रकरणात एकनाथ खडसे यांनी क्लीन चिट देण्यात आली होती. तर भंगाळेला १२ तासात उचलून जेल मध्ये टाकले होते. असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले आहे. तर ते आमचे जेष्ठ नेते मी त्यांच्यावर आरोप करणार नाही त्यांच्या काही तक्रारी असतील त्या घरात बसून दूर करू अस देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तर एकनाथ खडसे यांना भंगाळे नाही तर एमआयडीसीची कथित जमीन घोटाळ्यात राजीनामा द्यावा लागला असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस यांना उत्तर देताना एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली खदखद बोलून दाखवली आहे. “देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यापेक्षा जास्त मी संयमी आहे. संयम पाळला आहे. गेली पाच वर्ष झाली सहन केलं. एमआयडीसी प्रकरणात माझा राजीनामा घेतला, असं म्हणता तर तो कुठल्या कारणासाठी? एमआयडीसीची तथाकथित जी जमीन घेतली, ती एका मुस्लीम व्यक्तीची होती.2010 पर्यंत त्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर होते, तो उतारा मी दाखवतो. 2010 नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे पाहूनच ती जमीन माझ्या बायकोने, जावयाने खरेदी केली, एकनाथ खडसेने ती जमीन खरेदी केलेली नाही” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला.
“जर मी ती जमीन खरेदी केली असेन, तर मी त्यात दोषी आहे. बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर मी कसा दोषी? एखाद्या उताऱ्यामध्ये इतर हक्कात कोणाचे नाव असेल, तर तो मालक नाही होऊ शकत. इतकी तर समज माजी मुख्यमंत्र्यांना (देवेंद्र फडणवीस) असायला पाहिजे. त्यांना वाटत असेल, तर माझी ना नाही. पण मला समजवू तरी द्या” अस खडसे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
‘निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसेनेला जनता माफ करणार नाही’
कोणत्याही गोष्टीबाबत केंद्रसरकारला जबाबदार धरायची राज्य सरकारला सवयच आहे – देवेंद्र फडणवीस
राजकारण करून मराठा समाजाचे माथे भडकावू नका – उद्धव ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

