🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितक्या जास्त प्रमाणात राजकारणात ऍक्टिव्ह असतात तितक्याच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील विविध सामाजिक आणि कलेच्या दुनियेत ऍक्टिव्ह असतात. त्या नेहमीच त्यांच्या परखड वक्तव्यांमुळे किंवा गाण्यांमुळे चर्चेत असतात. त्यांनी नुकतंच एक असंच वक्तव्य केलं आहे, त्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मंगळसूत्र गळ्यात घातलं तर पतीने गळा पकडला आहे असं वाटतं, असं त्या म्हणाल्या.
अमृता फडणवीस या नुकत्याच एका मराठी कार्यक्रमाला उपस्थित होत्या. झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. हा एक मुलाखतपूर कार्यक्रम असून यावेळी त्यांना तुम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं नाही तर तुमच्या सासूबाई तुम्हाला ओरडत नाहीत का?, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देत त्या म्हणाल्या, “मला माहित आहे कि मंगळसूत्र हे स्त्रीच्या सौभाग्याचं प्रतिक आहे. पण वाटलं कि आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हात पकडावा त्यामुळे मी मंगळसूत्र गळ्यात न घालता ते हातात घालते. त्यामुळे मला सतत वाटत राहत कि देवेंद्रजींनी माझा हात धरला आहे. ही खूप छान फिलिंग आहे.” त्यांच्या याच विधानाची सर्वत्र चर्चा होत आहे.
https://www.instagram.com/tv/Cg0277Vqf1p/?utm_source=ig_web_copy_link
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांना आणखी एक प्रश्न विचारला गेला. त्यांनी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी केली आहे का? तर त्यावर त्या म्हणाल्या कि, “बरं झालं तुम्ही मला हा प्रश्न विचारलात. मला यावरुन अनेक जण ट्रोल करतात. पण त्याच असं आहे प्लास्टिक सर्जरी करणं ही खूप हिंमतीची गोष्ट आहे. त्यामध्ये काही बिघडलं तर तुमच्या चेहऱ्याचे सगळे फिचर्स बिघडू शकतात. मी लग्नापूर्वी एकदाही ब्युटी पार्लरमध्ये गेली नव्हते. फक्त लग्नाच्यावेळी जो मेकअप केला होता, तेवढाच… बाकी देवेनजी असे आहेत कि यांच्यासाठी स्त्रीचा चेहरा महत्त्वाचा नाही. ते तिचं मन पाहतात.”
https://www.instagram.com/p/CgzP4d1qTKA/?utm_source=ig_web_copy_link
या कार्यक्रमात अभिनेता सुबोध भावे हा सूत्रसंचालक आहे. या कार्यक्रमाचा फॉरमॅटच असा आहे कि, इथे विविध स्त्री सेलिब्रिटी येतात आणि त्यांना जनतेच्या मनातील प्रश्न विचारले जातात. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात खासदार सुप्रिया सुळे या सहभागी झाल्या होत्या. तो भागही प्रचंड गाजला होता. तर येत्या भागात मिसेस उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. या भागाचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- ZIM vs BAN : भारताविरुद्ध भिडण्याअगोदर झिम्बाब्वेने दाखवली ताकद; टी-२० मालिकेत बांगलादेशला नमवले!
- T20 World Cup : भारतीय क्रिकेट संघाच्या ‘या’ माजी कर्णधाराने घातले थेट निवडकर्त्यांनाच साकडे, म्हणाला…!
- Maharashtra Cabinet Expansion : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या?, सविस्तर वाचा…
- CWG 2022 : भारतीय महिला क्रिकेट संघाची जबरदस्त कामगिरी, केला सेमीफायनलमध्ये प्रवेश!
- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | शिवसेना कुणाची? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज ‘सर्वोच्च’ सुनावणी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
