🕒 1 min read
मुंबई : मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने हिंदी तसेच मराठी चित्रपटात देखील काम केले आहे. अमृताने हिंदी रिऍलिटी शॉ देखील केले आहेत. अमृता तिच्या सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलमुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. सध्या अमृता आणि सोनाली खरेचा सुंदर डान्सचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/reel/CU9YSSzgHeP/?utm_source=ig_web_copy_link
नवरात्रीनिमित्त सोनाली आणि अमृताने एका गाण्यावर ताल धरल्याचं पाहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अमृताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या दोघींही ‘बडी मुश्कील बाबा बडी मुश्कील’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या देखील पसंतीस येत असून यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सोनाली आणि अमृता या दोघींही आपल्या उत्तम अभिनयाने आणि आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. दोघींही फिटनेस बाबत देखील नेहमी जागरूक असल्याचे पाहायला मिळते. सोशल मिडीयावर वर्कआऊटचे व्हिडीओ देखील त्या शेअर करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
- … तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
- या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे; निलेश राणेंचा घणाघात
- ‘सत्ता आज आहे, उद्या नाही… सत्तेचा एवढा माज बरा नव्हे’
- केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
