Share

IPL 2023 | आयपीएल 2023 साठी नवीन अपडेट जारी, जाणून घ्या काय आहे?

Published On: 

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: 2023 मध्ये आयपीएल (IPL 2023) चा सोळावा हंगाम खेळला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या सर्वात मोठ्या लीगसाठी सर्व 10 संघांनी संघ बांधणी सुरू केली आहे. आयपीएल 2023 साठी कोचीमध्ये एक मिनी लिलाव (Mini Auction) आयोजित करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आयपीएलच्या पुढच्या टप्प्यासाठी एक नवीन अपडेट लागू करण्यात आला आहे. नवीन नियमांतर्गत संघाला नाणेफेक दरम्यान संघाच्या कर्णधाराला 11 खेळाडू आणि प्रभावशाली चार खेळाडूंची नावे द्यावे लागते. या सब्स्टिट्यूट फिल्डरच्या खेळाडूबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. नवीन अपडेटनुसार, यामध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूचा समावेश करता येणार नाही.

आयपीएल 2023 (IPL 2023) साठी नवीन नियम जारी

आयपीएलमध्ये पहिल्यांदाच प्रभावशाली खेळाडू नियम लागू करण्यात आला आहे. याआधी ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या जाणाऱ्या बिग बॅश  लीगमध्ये या नियमाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या लीगमध्ये हा नियम खूप महत्त्वाचा ठरला होता. कारण प्रभावशाली खेळाडू (इम्पॅक्ट प्लेयर) ने अनेक सामन्यांमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, आणि आयपीएलमधील सर्व फ्रेंचाईजींना सांगितले आहे की, कोणत्याही परदेशी खेळाडूला प्रभावशाली खेळाडू बनवता येणार नाही. याचा अर्थ असा होतो की, जेव्हा कर्णधार प्लेइंग 11 सोबत चार पर्यायी खेळाडूंची नावे घोषित करेल तेव्हा त्यातील सर्व खेळाडू भारतीय पाहिजे. प्लेइंग इलेव्हनमध्ये जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंचा समावेश करता येऊ शकतो. यामध्ये कोणताही बदल झाला नाही. मात्र, इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघाला परदेशी खेळाडूची निवड करता येणार नाही.

आयपीएलच्या नाणेफेक दरम्यान कर्णधाराला 11 खेळाडू सह चार अतिरिक्त भारतीय खेळाडूंची नावे द्यावे लागतील. हे चार खेळाडू इम्पॅक्ट प्लेयर असतील. हे इम्पॅक्ट खेळाडू प्लेइंग 11 मधील कोणत्याही एका खेळाडूच्या जागी खेळू शकतील. त्याचबरोबर संघ सामन्याच्या मध्यभागी कोणत्याही इम्पॅक्ट प्लेयरला बोलावून त्याला फलंदाजी किंवा गोलंदाजी करू देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!