Share

अमित शाह यांना आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह….?

Published On: 

मुंबई :- राज्यात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, विरोधी पक्षामधील नेते हेल्थ आणि डिझास्टर टुरिझमसाठी फिरत आहेत, असा सणसणीत टोला शिवसेनेचे युवा नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस आणि प्रवीन दरेकर यांना लगावला होता.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ‘डिझॅस्टर टुरिझम’ अशी टिका केल्यानंतर फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलंय. नया है वहं, म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवता येतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फार काही प्रतिक्रियाही देऊ नये.”या टीकेला संजय राऊत यांनी देखील जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

‘राजकारणात येणारा प्रत्येक माणुस नवीनच असतो. दिल्लीच्या राजकारणात अमित शहा देखील नवे आहे. पण आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह….?? मोदींनी पंतप्रधानपदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर दिल्लीच्या राजकारणात ते सुद्धा नवे होते. मात्र हे जरी दिल्लीच्या राजकारणात नवीन असले तरी कलम 370 हटवण्यासारखा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आमच्याकडे चांगल्याला चांगलंच म्हटलं जात. आम्हाला शिकवण आहे तशी…’ अशा शब्दात फडणवीसांच्या टीकेला राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

‘आदित्य ठाकरे तरूण आहेत. तडफदार आहे. कोरोनाच्या परिस्थितीत अगदी झोकून देऊन काम करत आहेत. वरळी कोळीवाडा त्यांच्या प्रयत्नांनी नियंत्रणाखाली आला. तसंच त्यांची टीम कोरोनाच्या काळात चांगलं काम करत आहे असं संजय राऊत म्हणाले .’

महत्वाच्या बातम्या-

‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’

परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?

जिल्हयात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्यांची तात्काळ माहीती द्या – डीवायएसपी टिपरसे

‘फडणवीस फिल्डवर काम करत असल्याने जनता कौतुक करित आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंना पोटशूळ उठले’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!