🕒 1 min read
मुंबई : ‘पश्चिम बंगालची निवडणूक सुरू असताना अमित शाह दावा करत होते की आम्हाला दोनशेहून अधिक जागा मिळतील. निकाल पूर्णपणे उलटा आहे. निवडणूक कालावधीत जेव्हा बंगालमध्ये हिंसाचार झाला, तेव्हा केंद्रीय सुरक्षा दलाने सहा लोकांना मारण्याचं काम केलं.
ममता बॅनर्जींनी अमित शाह यांचा राजीनामा मागितला होता. तेव्हा अमित शाह म्हणत होते की, मी त्यांच्या मागण्यावर राजीनामा देणार नाही. जनतेने मागणी केली तर राजीनामा देईल. एवढा मोठा पराभव याचा अर्थ जनता तुम्हाला राजीनामा मागत आहे. अमित शाह राजीनामा कधी देणार हे देश जाणू इच्छित आहे’ असे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
ममता जी ने जब अमित शाह जी का इस्तीफा मांगा था, अमित शाह जी कह रहे थे की जनता अगर मुझसे इस्तीफा मांगे तो मै दे दुंगा। इतनी बडी हार का मतलब ये है की लोग आपसे इस्तीफा मांग रहे है। अमित शाह जी देश जानना चाहता है की, आप कब इस्तीफा देंगे।
– कैबिनेट मंत्री ना.@nawabmalikncp साहेब pic.twitter.com/mQpOml2Xqn— NCP Mumbai (@MumbaiNCP) May 3, 2021
पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने झेंडा फडकावला आहे. प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपचा ममतांनी अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. या निकालानंतर आता देशभरातील विरोधकांकडून पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका होत आहे.
चुनाव में खुली छूट दि गयी, पुरे देश मे कोरोना फैलने की जिम्मेदारी चुनाव आयोग की है!
हम चाहते है की, सुप्रीम कोर्ट इसकी भी अलग से सूनवाई करे।
– कैबिनेट मंत्री ना.@nawabmalikncp साहेब#coronavirus pic.twitter.com/SfzaEOuUX1— NCP Mumbai (@MumbaiNCP) May 3, 2021
तसेच, ‘निवडणुकीत मोकळी सूट देण्यात आली, संपूर्ण देशात करोनाचा पसरण्यासाठी निवडणूक आयोग जबाबदार आहे! आम्हाला वाटतं की, सर्वोच्च न्यायालायने याची देखील स्वतंत्र सुनावणी करावी’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Fact Check : केंद्र सरकारने कोविड-19 साठीच्या लसींची ताजी मागणी नोंदवली नाही ?
- ‘रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा’ – आ. अतुल सावे
- औरंगाबादेत लसींचा तुटवडा, ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण बंद!
- मुलीची आठवण येते म्हणून आला अन् घटस्फोटीत पत्नीवर अत्याचार केला!
- औरंगाबाद मनपा प्रशासकपदी पांडेय यांना तिसऱ्यांदा बढती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

