🕒 1 min read
मुंबई : मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी (26-11 Mumbai terrorist attack) नागरिकांचे रक्षण करताना शहिद झालेल्या मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक तसेच अन्य सुरक्षा दलातील अधिकारी, जवानांच्या शौर्य व त्यागाचे स्मरण करत अनेकांनी आदरांजली वाहिली आहे. याच दिवशी पाकिस्तानातून (Pakistan) आलेल्या १० दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये अनेक लोकांनी आपला जीव गमवला. या मन हेलावणाऱ्या घटनेला आज १३ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय(Amit Malviya) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
मालवीय यांनी एका वृत्तपत्राची बातमी शेअर करत ‘जेव्हा २६/११ ला मुंबईवर हल्ला झाला, तेव्हा राहुल गांधी पार्टी करत होते, हे विसरणार नाही’, असे म्हंटले आहे. ही वर्तमानपत्राची कात्रण दरवर्षी २६/११ च्या निमित्ताने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जाते. या अहवालानुसार, मुंबईतील हल्ल्यानंतर लगेचच राहुल गांधी दिल्लीतील एका पार्टीत दिसले होते.
Rahul Gandhi was partying when Mumbai was attacked on 26/11. Never forget. pic.twitter.com/wn5iV8rXO4
— Amit Malviya (@amitmalviya) November 26, 2021
दरम्यान, २६/११ च्या हल्ल्यानंतर १ डिसेंबर २००८ रोजी ‘मेल टुडे’वर प्रसिद्ध झालेल्या या बातमीत असे सांगण्यात आले, की मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आईचे अश्रू सुकले नव्हते आणि राहुल गांधी लगेचच एका फार्महाऊसवर मित्रांसोबत पार्टी करताना दिसले. दिल्ली रिपोर्टनुसार, राहुल गांधी त्यांचा मित्र समीर शर्माच्या संगीत समारंभात गेले होते, असे बातमीमध्ये म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘अब की बार मोदी सरकार’ची आठवण करून देत शिवसेनेचा हल्लाबोल
- मागील सात वर्षांत झालेली इंधनाची जबर दरवाढ हेच महागाईच्या भरारीचे मुख्य कारण- संजय राऊत
- राजनाथ सिंह यांनी केला पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगींच्या ‘त्या’ फोटोचा खुलासा
- आज विज्ञानाचा आग्रह किंवा आस्था निर्माण करण्याची आत्यंतिक गरज- शरद पवार
- हा महाराष्ट्र आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीमध्येच सूत्रसंचालन करण्यात यावं- भगतसिंह कोश्यारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
