Share

इतर आजारांच्या रुग्णाकडे दुर्लक्ष करू नका,अमित देशमुखांची वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना सूचना

Published On: 

लातूर : कोविड १९ रुग्ण संख्या अधिक असलेल्या भागात वैद्यकीय महाविद्यालयांनी अतिरीक्त सुविधा उभारून रुग्णालये सज्ज ठेवावीत, येणाऱ्या रुग्णावर तातडीने उपचार करावेत, रुग्ण ठणठणीत बरे झाल्यावरच त्यांना घरी सोडावे, दरम्यान इतर आजाराच्या रुग्णाकडे दुर्लक्ष होऊ नये आदी सुचना, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना दिल्या आहेत.

राज्यात ज्या भागात कोविड १९ रुग्णांची संख्या अधिक आहे. अशा मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, धुळे, नागपुर, अकोला, यवतमाळ, जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांची झूम ॲपच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सोमवारी बैठक घेतली. या विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने हे ही बैठकीत सहभागी झाले होते.

आपल्या भागातील कोविड 19 रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीची दखल घेऊन संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांनी जास्तीत जास्त रुग्णावर उपचार करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी करून घ्यावी, डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा तसेच औषध आणि इतर आवश्यक साधनांचा योग्य प्रमाणात साठा तयार करून ठेवावा. रुग्णालयातील बेड वाढवून घ्यावे, रुग्णालय नेहमी स्वच्छ ठेवावीत, येणाऱ्या रुग्णांना मानसिक आधार द्यावा, त्यांच्यावर तातडीने उपचार करावेत, या रुग्णांना सकस व चांगल्या प्रकारचे जेवण मिळावे, रुग्ण ठणठणीत बरे झाल्यानंतरच त्यांना घरी सोडावे आदी सूचना यावेळी देशमुख यांनी दिल्या.

कोविड 19 रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरर्स, नर्स, मेडिकल्स, पॅरामेडिकल यांच्यासह सफाई कामगारांची काळजी घ्यावी, त्यांच्या नियमितपणे आरोग्य तपासणी करावी, त्यांना सर्व प्रकारच्या सुरक्षा साधने वेळेत पुरवठा करावा अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत. सदय परिस्थितीत वैद्यकीय अधिष्ठातावर अतिरिक्त ताण आहे याची जाणीव असल्याचे सांगून, कोविड 19 विषाणू विरुद्ध आपण लढतो आहोत, त्यामुळे अधिष्ठातानी आणि स्वतःबरोबर आपल्या स्टाफची ही काळजी घ्यावी असे देशमुख यांनी म्हटले आहे.

कोविड 19 विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामी आणि संबंधित रुग्णावर उपचार करण्याच्या प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्वच डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करावेत, निवासी डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचेही पगार आणि मानधन वेळेत अदा करावेत अशा सूचनाही देशमुखांनी या बैठकीत केल्या आहेत.

महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण विभागातर्गत असलेल्या रुग्णालयातील एकूण 97 डॉक्टर व कर्मचारी यांना कोविड 19 ची लागण झाली असून, 22 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत, इतरांना दुरुस्त झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली असल्याची माहिती या बैठकी दरम्यान देण्यात आली असता रुग्णांची काळजी घेत असताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी स्वतःचीही काळजी घ्यावी. हॉस्पिटल मधील आवश्यक असणाऱ्या साधनांची तातडीने रीतसर मागणी नोंदवावी मंत्रीमंडळातील बैठकीत त्याची मंजुरी घेऊन ताबडतोब पुरवठा केला जाईल असे आश्वासनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी यावेळी दिले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!