Share

कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी अमेरिकेकडून भारताला आणखी ३० लाख डॉलरची मदत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा –  कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात दिला आहे. आता अमेरिकन सरकारने यूएसएआयडीच्या माध्यमातून कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला अतिरिक्त ३० लाख अमेरिकन डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे.

यूएसएआयडीने यापूर्वी ६ एप्रिलला कोरोनाचा सामना करण्यासाठी २९ लाख अमेरिकन डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली होती. आधीच आपल्या देशासाठी भल्या मोठ्या पॅकेजची घोषणा केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जगातील इतर देशांसाठीही मदतीचा हात देत आहेत.

कोरोनाविरोधातील भारताच्या लढाईला या अतिरिक्त मदतीमुळे बळ मिळेल. तसेच हे भारत आणि अमेरिकेच्या भागीदारीचे एक महत्वाचं उदाहरण आहे, असं भारतातील अमेरिकेचे राजदूत कॅनेथ जस्टर यांनी म्हटलं आहे.

आंतरराष्ट्रीय विकासासाठी अमेरिकन एजन्सी यूएसआयडी ही जागतीक पातळीवरील मदत करणाऱ्या प्रमुख एजन्सींपैकी एक आहे. आतापर्यंत यूएसएआयडीने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला ५९ लाख अमेरिकन डॉलर्सची मदत केली आहे, असंही कॅनेथ जस्टर यांनी सांगितलं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!