Share

चेन्नई सुपर किंग्जकडून तीन वर्ष खेळण्याचा अंबाती रायडूने दाखवला विश्वास

Published On: 

नवी दिल्ली : आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी अंबाती रायुडूला चेन्नई सुपर किंग्जमधून सोडण्यात आले आहे. चेन्नई (CSK)  संघातून अनेक मोठी नावे बाहेर पडली आहेत. यातच अंबाती रायुडूचे  (Ambati Rayudu) देखील नाव आहे. दरम्यान, अंबाती रायुडूने अजून पुढील तीन वर्षे खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आणि त्याला आशा आहे की चेन्नई सुपर किंग्ज संघात त्याचा समावेश होईल.

पीटीआयशी बोलताना रायडू म्हणाला की, “जोपर्यंत मी चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि तंदुरुस्त आहे तोपर्यंत मला खेळायला आवडेल. मी पुढील सायकलसाठी तयार आहे, जे तीन वर्षांचे आहे आणि मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत घेत आहे. अलीकडेच मी विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळलो जेथे सहा दिवसांत पाच सामने झाले आणि मला ते चांगले वाटले. मी चांगल्या स्थितीत आहे आणि पुढील तीन वर्षे तरी मला खेळायचे आहे.

तो पुढे म्हणाला की 2019 चा विश्वचषक माझ्यासाठी निश्चितच निराशाजनक होता, कारण मी संघात नव्हतो. माझे पुनरागमन सीएसकेला समर्पित होते आणि त्यांनी मला त्या टप्प्यात आणि वेळेत मदत केली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

विशेष म्हणजे २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेत अंबाती रायडूची संघात निवड झाली नव्हती. नंतर शिखर धवन बाद झाल्यावर ऋषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला, मात्र रायडूचा संघात समावेश करण्यात आला नाही. यानंतर मोठा गदारोळही पाहायला मिळाला. रायुडूचा संघात समावेश न करण्याचा निर्णय अनेकांनी चुकीचा असल्याचे म्हटले आहे.

चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झाल्यानंतर रायडूने अनेक सामन्यांमध्ये दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपद पटकावले होते. मेगा लिलावात रायुडूला संघात परत घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!