Share

जनतेच्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवारास निवडून द्या – अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

सिल्लोड : जनतेच्या सतत संपर्कात राहणाऱ्या अब्दुल सत्तार यांना निवडून द्या,” असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, आमदार अंबादास दानवे यांनी केले. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या प्रचारार्थ घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भराडी, आमठाणा, अंभई, पळशी, अंधारी गावांतही दानवे यांच्या प्रचारसभा झाल्या.

यादरम्यान दानवे म्हणाले, सहकार क्षेत्रातील महत्त्वाचा सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना ज्यांना नीटपणे सांभाळता आला नाही, त्यांच्याकडून विधानसभेचा मतदारसंघ काय सांभाळला जाईल.

शिवसेनेमध्ये जातीपातीचे राजकारण होत नाही. मुळात शिवसेनेच्या हिंदुत्वाची व्याख्या म्हणजे घटनेला मानणारा, भारतमातेला मानणारा तो हिंदू. उगाच मराठा समाजाला बदनाम करण्याचे काम विरोधक करीत आहेत. जो-जो महाराष्ट्रामध्ये राहतो तो मराठा होय.

मराठा आरक्षण आंदोलन झाले तेव्हा अब्दुल सत्तार यांनी आरक्षणाला पाठिंबा देत आंदोलने केली. शिवसेनेचा कार्यक्रम एकदा ठरला की ठरला. त्यामध्ये बदल होत नाही; परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यासाठी कार्यक्रमामध्ये बदल करीत सभा घेतली.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1184059705624166401?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1184058865450536960?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!