पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना अद्याप सरकारकडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या काळात राज्यातील नाभिक समाजाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून सुमारे 20 लाख लोकांवर बेरोजगारीचे संकट आहे.
सुरक्षा रक्षकांची नजर चुकवुन अनोळखी इसमाचा तुळजाभवानी मंदीरात प्रवेश
सलूनचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे अडचणीत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सलून चालकांना व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या काळात राज्यातील नाभिक समाजाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून सुमारे 20 लाख लोकांवर बेरोजगारीचे संकट आहे. त्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यात येतील, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले आहे.
महाराष्ट्रातील विविध नाभिक समाजातील संस्थांचे प्रतिनिधी तसेच राज्यातील सलून/वेलनेस उद्योगांतील प्रतिनिधींशी आज त्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. वेलनेस अम्बेसेडर रेखाताई चौधरी यांनी ही चर्चा घडवून आणली होती. गावागावांतील केश कर्तनालयापासून ते शहरांतील मोठ्या सलूनपर्यंत या व्यवसायात सुमारे 20 लाख लोकांना रोजगार प्राप्त होतो. कोरोना प्रादुर्भाव, टाळेबंदी आणि त्यानंतर हळूहळू सूट देण्याचा क्रम यात केंद्र सरकारने या व्यवसायाला सूट दिली आहे. अन्य राज्यांनी सुद्धा या व्यवसायाला सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र महाराष्ट्रात अजून सूट देण्यात आलेली नाही.
चॅरीटेबल ट्रस्ट अंतर्गत नोंदणी असलेल्या रूग्णालयांनी खाटा राखीव ठेवणे बंधनकारक
त्यामुळे बेरोजगारीची मोठी कुर्हाड या व्यवसायावर, या व्यवसायात काम करणार्यांवर कोसळते आहे. हे सारे गरिब अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील व्यवसायिकांनी सुद्धा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वत:चे प्रोटोकॉल्स तयार केले आहेत. त्याचे पालन करून व्यवसाय सुरू करण्याची अनुमती द्यावी, ही त्यांची मागणी आहे. याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
