टीम महाराष्ट्र देशा : आम्हाला जे टार्गेट करायचे होते, ते आम्ही केलं, याचे पुरावे आमच्याकडे आहेत, आता सरकारला ते पुरावे जेव्हा मांडायचे असतील, ते मांडतील अशाप्रकारे पाकिस्तानात घुसून मारल्याची पुष्टी भारतीय लष्करान केली आहे.
दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारताने चहूबाजूने प्रयत्न सुरु केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भारतीय संरक्षण यंत्रणांची महत्त्वाच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे देशाच्या तीनही दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.
यावेळी नौदालाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला उद्या अभिनंदन येण्याची वाट पाहतोय अस ठणकावल असून, पाक ने भारतीय आर्मीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता,आमची लढाई दहशतवादाविरोधात आहे, ते जोपर्यंत दहशतवाद संपवणार नाहीत, तोपर्यंत आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करत राहू अस देखील भारताच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
