Share

मुंबईत सर्व शिथिलता रद्द, पुण्यात कधी निर्णय घेणार ; महापौरांच्या राज्य सरकारला सवाल

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मुंबई महापालिकेने लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता अखेर रद्द केली आहे. 3 एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारने शिथिलता दिली होती. त्यानुसार अत्यावश्यक सेवेच्या दुकानांव्यतिरिक्त इतर दुकानं सुरू करण्याची परवानगी सरकारने दिली होती. दारूच्या दुकानांनाही परवानगी देण्यात आली होती. मात्र दारू खरेदी करण्यासाठी मुंबईत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दोन दिवस पहायला मिळालं होत.

त्यामुळे मुंबईतील सर्व सवलती रद्द करण्यात आल्या आहेत. याआधी जे निर्णय घेण्यात आले आहेत, ते सर्व रद्द करण्यात आले आहेत. लॉकडाऊनदरम्यान मुंबईकरांना आता कोणतीही सवलत मिळणार नाही. मुंबईत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहातील. मुंबईकर शिस्त पाळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यावर आता मुंबई प्रमाणे पुण्यात सुद्धा सर्व शिथिलता रद्द करण्यात याव्या अशी मागणी पुण्याच्या महापौरांनी केली आहे. मुंबईत नव्या लॉकडाऊनअंतर्गत दिलेली शिथिलता रद्द करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी घेतला आहे. त्याबद्द्ल त्यांचे धन्यवाद. मुंबईत उद्यापासून केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु असतील. पुण्यात असा निर्णय कधी होणार असा सवाल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ यांनी राज्यसरकरला विचारला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!